रत्नागिरी : रत्नागिरी मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी बंद पडल्याचा खोटा प्रचार काहीजण करताना दिसत आहेत. तसे खोटे मेसेज देखील काहीजण पसरवत आहेत. मात्र वस्तुस्थिती हि आहे कि भारती शिपयार्ड कंपनीच्या जागेवर योमन मरीन हि कंपनी सुरु असून यामुळे रत्नागिरीतील सुमारे ३०० कामगार विविध पदांवर या कंपनीत कामावर असल्याचा खुलासा मिऱ्या येथील माजी सरपंच दिनेश सावंत यांनी केला आहे.
पूर्वीची भारती शिययार्ड हि कंपनी केवळ नवीन जहाजे तयार करीत होती. मात्र योमन मरीन हि कंपनी आता नवीन जहाजांसोबत जहाजांच्या दुरुस्तीची कामे देखील करीत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामुळे अनेक वर्ष बंद पडलेल्या कंपनीच्या जागी नवीन कंपनी सुरु होऊन बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र काही विरोधक खोटा प्रचार करीत येथील कंपनी बंद पडल्याचे सांगत आहेत, असे माजी सरपंच दिनेश सावंत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 18-11-2024














