पावस : या मतदारसंघातील अनेक तरुण नोकरी धंद्यानिमित्त शहराच्या ठिकाणी जात असतात. मात्र त्यांचे आई वडील गावामध्येच असतात. हे स्थलांतर थांबावे, यासाठी या मतदारसंघांमध्ये वीस हजार कोटीचा प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्या माध्यमातून तीस हजार बेरोजगार तरुणांना गावांमध्येच नोकरी मिळणार आहे. त्यामुळे येथील तरुण आई-वडिलांसोबतच राहतील आणि रोजंदारीचा प्रश्न मिटेल, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी मतदारसंघातील पावस जिल्हा परिषद गटातील मेवों येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी खर्च करून विकासकामांचा पाया रचला आहे. तरीही विरोधक या मतदारसंघांमध्ये विकास झाला नाही असा खोटा प्रचार करीत आहेत, या मतदारसंघामध्ये माझ्या व इतर योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला
हा खर्च केला नसल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन. प्रत्येक निवडणुकीमध्ये पडणाऱ्या उमेदवाराने या गोष्टी सांगू नयेत. या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे, तालुकाध्यक्ष दादा दळी, आनंद देसाई, भाजप नेते प्रकाश पवार, राजेश पाचरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बंटी वणजू आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 18/Nov/2024














