पावस-मावळंगे रस्त्याशेजारी खोदाई; वाहनचालकांना त्रास

पावस : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पावस ते मावळंगे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार खोदाई सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खोदाईमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. जाणूनबुजून ठेकेदार गटार खोदाई करून गटारातील माती रस्त्यावर टाकत आहे. त्यामुळे वाहन चालवताना अडथळे येत आहेत. या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 18/Nov/2024