चिपळूण : ग्रंथ व्यवहार नवनवीन तंत्रसुविधांमुळे अडचणीत आहेत. त्याचा परिणाम ग्रंथालयांवर होत आहे आणि म्हणून ग्रंथालयांचा लोकाश्रय कमी होत आहे. या परिस्थितीत काय करावे? ग्रंथालयांना काही नवे रूप धारण करता येईल का? अशा विविध अंगांनी उपाययोजनेचा विचार करण्याकरिता २५ नोव्हेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे ग्रंथालय मित्रमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या चर्चासत्रात गिरीश घाटे, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. यतीन जाधव, डॉ. माधव बापट व दिनकर गांगल आदी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे. चर्चेचा आरंभ ठाण्याचे उद्योजक, लेखक व ग्रंथप्रेमी गिरीश घाटे यांच्या निवेदनाने होईल. त्यानंतर खुली चर्चा होणार आहे. यावेळी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिरचे अध्यक्ष यतीन जाधव या मित्रमेळाव्यात दिवसभर चर्चासत्र पार पडणार आहेत. अध्यक्षस्थानी असतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 18/Nov/2024