मतदारसंघात जास्त निधी आणून विकासकामे करणार : किरण सामंत

लांजा : समाजासमाजात भेदभाव करणारा मी नव्हे, सर्व जाती-धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचा विकासात्मक उद्धार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. तसेच जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांतून उद्धार करू. त्याचबरोबर शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी लांजा तालुका मुस्लिम अल्पसंख्याक सेलच्या मेळाव्यात बोलताना केले.

लांजा तालुका शिवसेना मुस्लिम अल्पसंख्याक सेलच्यावतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप, नगरसेवक सोहेल मुकादम, राजन देसाई, अल्ताफ काझी, उद्योजक हनीफ नाईक, कोर्लेचे सरपंच गणेश साळुंके, अल्पसंख्याक सेल लांजा तालुकाध्यक्ष सईद मापारी, इलियास बंदरी आदी उपस्थित होते.

किरण सामंत म्हणाले, विकासकामे तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच करेन. या भागात अल्पसंख्याक निधी आणला गेला नाही. आला असेल तर तो पूर्णपणे वापरला गेला नाही. यापुढे असे होणार नाही. राजापूर, लांजामध्ये दोन मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुका मुस्लिम अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सईद मापारी, उपाध्यक्ष साजिद शेख, आजीम वाघु, शादाब काझी, मुनाफ दसूरकर, मोसीन दसूरकर यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 18/Nov/2024