रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील एका हॉटेलबाहेर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वा. करण्यात आली.

प्रवीण गणपत लोंढे (वय ४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात महिला पोलिस कॉन्स्टेबल सेजल ठुकरुल हिने तक्रार दिली आहे.

त्यानुसार, रविवारी सायंकाळी संशयित हा त्याच्याकडे दारू पिण्याचा परवाना नसतानाही सार्वजानिक ठिकाणी आपल्या पुढ्यात दारूची बाटली ठेवून बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 19/Nov/2024