रत्नागिरी : बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीप्रकरणी गुन्हा

रत्नागिरी : शहरातील जांभूळ फाटा ते पाटीलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर तसेच खडपेवठार ते राजीवडा जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची आणि विदेशी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४० ते ६.२५ वा. कालावधीत करण्यात आली. सुनील सदाशिव जाधव (५०) आणि बिपिन महादेव शेट्ये (४२) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी दिलेल्या तक्रारी नुसार, यातील सुनील जाधव हा आपल्या ताब्यात २ हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, तर बिपिन शेट्ये हा ८४० रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 19/Nov/2024