मंडणगड मध्ये वारंवार इंटरनेट सेवा खंडित

मंडणगड : मंडणगड तालुक्यात वांरवार खंडित होणाऱ्या इंटरनेटमुळे शहरातील सर्वच बँकांची सिस्टीम तासन् तास ठप्प होत असल्याने तालुकावासीयांचे मोठे हाल होत आहेत.

शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका बदलत्या काळात इंटरनेटवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात इंटरनेट सेवा बंद पडून बँकांचे कामकाज दिवसभर ठप्प राहण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आठवड्याचे शेवटचे तीन दिवस बँकांची एटीएम सेवा ठप्प राहण्याची समस्या होतीच, त्यात आता नेट बंद असण्याच्या समस्येची नव्याने भर पडली आहे. रोकड तसेच अन्य व्यवहारासाठी बँकेत जाणाऱ्या लाडक्या बहिणींना रांगेत तासन् तास उभे रहावे लागत आहे. बँक अधिकारी महिलांना नेट नाही, तुमचे काम दोन महिन्यांनी होईल, अशी उत्तरे बेधडक येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 19/Nov/2024