लातूरच्या वृद्धाचा रत्नागिरीत उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू

खेड : लातूर येथील ७८ वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारुती बाळाराम सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 19/Nov/2024