रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी बीअरचा टिन घेऊन पिण्यासाठी बसलेल्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रविवार १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२५ वा. करण्यात आली. विश्वनाथ नथुराम मोरे (वय ३८) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री संशयित हा आठवडा बाजार येथील नगरपरिषदेच्या इमारतीच्या मागील बाजूस पॅसेजमध्ये बीअरचा टिन घेऊन बसलेला असताना ही करवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 19/Nov/2024














