चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण यंत्रणा मतदान यशस्वी पार पडावे, यासाठी सक्रिय झाली असून, मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रांवर पाठविणार आहेत. एकूण ३३६ मतदान केंद्रांपैकी चिपळूणमध्ये १७० तर संगमेश्वरातील १६६ मतदान केंद्रांवर यंत्रे रवाना होतील. चिपळुणातील ११९ तर संगमेश्वरमधील ४५ मतदान केंद्रे सीसीटीव्हीच्या कक्षेत असणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ७६ हजार ६५ मतदार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 19/Nov/2024














