संगमेश्वर : रांगव गवळीवाडी येथील ग्रामस्थांनी स्वखर्चाने बसवले सोलर लाईट

संगमेश्वर : तालुक्यातील रांगव गवळीवाडी ही डोंगराच्या कुशीत वसलेली आहे. सध्या कोकणात बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर ये-जा करताना लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला दिलासा मिळावा म्हणून ग्रामस्थांनीच सोलर लाईट बसवला आहे.

श्रीकृष्ण युवक मंडळाचे सचिव संजय चिले यांच्या संकल्पनेतून व मंडळाचे अध्यक्ष दिलीप थोरावशे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगव गवळी वाडीतील ग्रामस्थ व मुंबई कमिटीतील पदाधिकारी एकत्र येऊन स्वखर्चाने प्रत्येकाच्या सौजन्याने वाडीतील रस्त्यावर व आजूबाजूच्या परिसरात १० सोलर लाईटची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे संपूर्ण वाडी प्रकाशाने उजळून निघाली.

या कामासाठी मुंबई मंडळ व स्थानिक वाडकरी यांनी आपले योगदान दिले. वाडीतील ज्येष्ठ मंडळी सीताराम चिले, उदय चाचे, तुकाराम भालेकर, शांताराम थोरावसे, शिवराम चिले, शंकर बोबडे, चंद्रकांत खताते, श्रीकांत थोरवासे, सुधाकर भालेकर, किरण खताते, संदीप ठोरावसे, अनंत चिले आणि उमेश चाचे यांनी केलेल्या कामाचे मुंबई मंडळाचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 19/Nov/2024