रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
मतदानामध्ये मतदारांनी विक्रमी संख्येने सहभाग नोंदवावा, साप्ताहिक सुट्टया व मतदानाची सुट्टी यांना जोडून सलग सुट्टया घेऊन पर्यटनासाठी न जाता मतदानाच्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पथनाट्यातूनही जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली. मिरकरवाडा येथील बंदरात १५० नौकांची बोट रॅली काढून मच्छीमारांमध्येही जागृती करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 19/Nov/2024














