रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात नीलम महोत्सव

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचा वर्धापन दिन दरवर्षी दि.११ नोव्हेंबर रोजी संशोधन केंद्रामार्फत साजरा केला जातो. या वर्षी संशोधन केंद्राचा वर्धापन दिन ‘नीलम महोत्सव’ म्हणून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. पी. ई. शिनगारे, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगावचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नाईक, मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, शिरगावचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर उपस्थित होते.

या वेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या ६५ वर्षांतील कार्यावर संशोधन केंद्रातील लिपिक सचिन पावसकर यांनी स्वलिखित गीत जाकडी लोकनृत्याच्या चालीवर सादर केले. सूत्रसंचालन अपुर्वा सावंत, वरिष्ठ संशोधन सहायक यांनी केले. आभार सहायक संशोधन अधिकारी सचिन साटम यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 19/Nov/2024