रत्नागिरी : बेकरी मालकिणीशी झालेल्या वादात समजूत काढणाऱ्याच्याच डोक्यात बीअरची बाटली मारून दुखापत करणाऱ्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वा. सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथे घडली.
प्रसाद बोरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात राकेश सुरेश शिंदे (३७) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते एमआयडीसी येथील बेकरीत कामाला असून संशयित प्रसाद हा गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यासोबत ड्रायव्हरचे काम करत आहे. १४ नोव्हेंबर रोजी प्रसाद बेकरीतील माल विक्री करून त्याचा हिशोब न देता निघून गेला होता.
याबाबत रविवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी बेकरीच्या मालकिणीने त्याच्याकडे मालाच्या बेकरीच्या पैशांबाबत विचारणा केली असता तो तिच्याशी वाद विवाद करत होता. तेव्हा फिर्यादीने राकेश शिंदेने प्रसादला समजावले होते.
याबाबत राग मनात धरून प्रसादने काचेची बीअरची बाटली राकेशच्या डोक्यात मारून दुखापत केली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 19/Nov/2024














