खेड बसस्थानकाच्या छताचे काम अखेर पूर्ण

खेड : येथील बसस्थानकातील जुनाट झालेल्या छताचे काम अखेर पूर्ण झाले आहे. आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ एसटी प्रशासनाने छताच्या डागडुजीसाठी निधीची उपलब्धतता करून दिली. त्यानुसार स्थानकातील छतावरील जुनाट पत्रे बदलून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात आले. अंतर्गत कामांनी देखील वेग घेतला आहे. येथील उभारणीपासून देखभाल दुरुस्तीकडे एसटी प्रशासनाने कानाडोळा केला होता. दुरुस्तीसाठी येथील एसटीस्थानकाच्या प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवून सतत पाठपुरावा करूनदेखील त्यांच्या पदरी अपयश आले होते. यामुळे बसस्थानकाची अवस्था बिकट झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 19/Nov/2024