रत्नागिरी : शहरानजीकच्या आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे पुलावर तरुणाने भरधाव रेल्वे गाडीसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३.४५ ते ४ या कालावधीत घडली आहे. वासू दौलत कडकपट्टी (२२, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या ठिकाणी तरुणाचे शीर धडावेगळे झालेल आढळून आले. मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 19/Nov/2024














