कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ४५ गाड्यांचा वेग ताशी १२० किलोमीटर

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा कमाल वेग ताशी १२० किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे. रोहा ते ठोकूर या ७०० किलोमीटरच्या मार्गावर ताशी १२० किलोमीटरची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे ४५ गाड्यांचा वेग वाढणार आहे.

यापूर्वी केवळ तेजस एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस आणि वंदे भारत या गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा १२० कि.मी. प्रतितास होती. इतर गाड्यांची कमाल अनुज्ञेय वेगमर्यादा ११० कि.मी. प्रतितास होती. ती आता वाढवण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांची वेगमर्यादा वाढवल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असून, प्रवासही सुखकर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 19/Nov/2024