चिपळूण : संजीवनी नर्सिंग कॉलेजमध्ये मधुमेह दिन

चिपळूण : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. वृषाली बापट यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वृषाली बापट यांचे सारिका वेळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डॉ. वृषाली बापट यांनी मधुमेह आजाराविषयी मार्गदर्शन केले. सतत थकवा येणे, घाम येणे, हात थरथरणे, तहान लागणे, सारखे युरिनला होणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, चक्कर, जखम लवकर न भरणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कॉलेजचे शिक्षक आदिती पटवर्धन, सारिका वेळेकर, सहकारी मनेष भिसे, ऑपरेशन थेटर टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी व डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 19/Nov/2024