खेड : जेसीआयच्या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम करण्याचे लक्ष्य

खेड : जेसीआय खेडचा ४३ वा पदग्रहण सोहळा पाटणे लॉन येथे पार पडला. २०२४ चे मावळते अध्यक्ष संकेत आपिष्टे यांनी २०२५ चे नूतन अध्यक्ष अमर दळवी यांना अध्यक्षपदाची व नूतन सेक्रेटरी कपिल कोळेकर व लोम गव्हर्निंग बोर्ड यांना शपथ दिली. त्यानंतर वर्षभर केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अमर दळवी यांनी जेसीआय ही संघटना १८ ते ४० वर्षांतील तरुणांना सक्षम करण्याचे काम प्रशिक्षणाद्वारे करते आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रशिक्षण सेमिनार आयोजन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोवर समाजपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे अध्यक्षपद स्वीकारत असताना त्यांनी सांगितले.

यावेळी २०२४ या वर्षांतील उत्कृष्ट जेसी पुरस्कार म्हणून सर्वोत्कृष्ट पुरस्कार असणारा कमलपत्र दीपक नलावडे, आऊटस्टैंडिंग म्हणून अमित नामुष्टे, आऊटस्टैंडिंग न्यू म्हणून अमित गरुड, आऊटस्टैंडिंग ऑफिसर अमर दळवी, आऊटस्टैंडिंग पीसी दानिश पाटणे यांना संकेत आपिष्टे यांच्याकडून प्रदान करण्यात आले.

या समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विलासभाई बुटाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी जेसीआय खेडचे सदस्य उत्तमरित्या कार्य करतात हे सांगत कौतुक केले. यावेळी नॅशनल हेअर ब्युटी अॅकॅडमी मुंबईचे चेअरमन तुषार चव्हाण, झोन ११ चे विभागीय अध्यक्ष अतुल गोंदकर, विशेष निमंत्रित म्हणून जेसीआय इंडिया विभाग ११ चे विभागीय अध्यक्ष शाबा गौस व उपाध्यक्षा अर्चना राजन यांसह जेसीआय खेडचे सर्व माजी अध्यक्ष, सभासद, नवीन सभासद, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, जेसी परिवार उपस्थित होते.

सूत्रसंचालन उपाध्यक्ष अमित नामुष्टे आणि माजी अध्यक्ष प्रथमेश खामकर यांनी केले. उपाध्यक्ष मधुर पेठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 19/Nov/2024