रत्नागिरी : शारीरिक व मानसिकतेने सशक्त बनवायला खेळ उपयुक्त आहेत. यश-अपयश कसे पचवावे हे खेळ आपल्याला शिकवतात. नेतृत्वगुण, समयसूचकता इत्यादी बाबींची शिकवण या खेळामधूनच मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी व्यक्त केले.
सावर्डे (ता. चिपळूण) येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले.
या प्रसंगी क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे व अमृत कडगावे यांनी खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या महोत्सवात सांघिक स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल व ४ बाय १०० मीटर रिले या क्रीडाप्रकारांचा तर गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, चारशे मीटर धावणे या वैयक्तिक क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 19-11-2024