मंडणगड बसस्थानक परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी

मंडणगड : मंडणगड बसस्थानकाचे परिसरातील रस्त्यावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी तालुकावासीयांमधून केली जाते. मंडणगड शहराची नगरपंचायत, येथील पोलीस प्रशासन व बांधकाम विभाग या सर्व संबंधीत यंत्रणांनी या समस्येकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. एस.टी. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या या रस्त्यावर असलेले रिक्षा स्टँड, रस्त्यालगत असेलली दुकाने रस्त्यावर दुतर्फा सुरु असणारी वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वेळोवेळी उत्पन्न होते.

सिंगल रोडमुळे दोन वाहने एकाच वेळी पास होत नसल्याने गाड्या थांबुन हल्ली दररोज वाहतूक ठप्प होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे नागरीकांचा कधी कधी खोळंबा होतो. याकडे सर्व यत्रणांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. या रस्तायवर एस.टी. ड्रायव्हर व रिक्षाचालक यांच्यामध्ये रस्त्याची वाहतूक स्थितीवरुन वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे नागरीक व अन्य वाहनचालकांची अडचण होते. एस. टी. ड्रायव्हर वेळोवेळी करीत असलेल्या दबंगगिरीमुळे वाहतूक कोंडी होते व त्यास तालुकावासीय पुरते कंटाळलेले आहेत. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये या करिता सर्व संबंधित यंत्रणांनी वादाचे प्रसंग निर्माण होण्यापुर्वीच किंवा मोठा अपघात होऊन त्यामुळे जीवत व वित्तहानी होण्यापुर्वीच समाधानकारक पर्याय शोधावा अशी मागणी तालुकावासीयांमधून जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 19/Nov/2024