दापोली : २६३-दापोली विधानसभा मतदान संघातील सर्व मतदार यांना, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी कळविले आहे की, २६३-दापोली विधानसभा मतदान दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत दापोली विधानसभा मतदान संघातील ३९२ मतदार केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२८ नुसार मतदानाची गुप्तता राखणे आवश्यक आहे. व अशी गुप्तता न राखल्यास त्याबाबत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. सबब भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तिशिवाय मतदान केंद्रामध्ये अन्य कोणत्याही व्यक्तिस छायाचित्रण किंवा व्हिडीओग्राफी करता येणार नाही. सबब मतदान केंद्रामध्ये मतदार यांना प्रवेश देताना त्यांच्याकडे मोबाईल फोन, कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण असणार नाही. या बाबतची खातरजमा मतदान केंद्राबाहेरील सुरक्षा रक्षक यांनी करुनच मतदान केंद्रामध्ये प्रवेश देणेचा आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य बाळगता येणार नाही. त्यांनी मतदान करण्यासाठी येताना त्यांचे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणले असल्यास ते मतदान केंद्राबाहेर त्यांचे नातेवाईक अगर सोबत्याकडे स्वतःच्या जबाबदारीवर देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश करावा व प्रशासनास मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य करावे.
तरी सर्व मतदारांनी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. थोरबोले यानी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 19/Nov/2024