चिपळूण : तालुक्यात ९९ टक्के भात कापणी पूर्ण झाली आहे. कोकणातील भातशेती हे प्रमुख पिकांपैकी एक असून, बहुतांशी शेतकरी वर्गाकडून याच पिकाची लागवड केली जाते. तालुक्यात सुमारे ६२०० हेक्टर क्षेत्र भातशेती लागवडीखाली आहे.
भातशेती लागवडीदरम्यान पुरेसा झालेला पाऊस व त्यानंतर पोषक वातावरण मिळाले होते. त्यामध्ये कमी कालावधीत हळवी शेती ऑक्टोबर महिन्यात बहरल्यानंतर ती कापण्यास तयार झाली होती.
त्या पाठोपाठ उशिरा कालावधीतील महान जातीच्या भात पिकांच्या लोंब्या फुलोऱ्यातून डोकावू लागल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्या कापणीलायक तयार झाल्या होत्या.
मोठ्या कष्टाने लागवड केलेली शेती बहरल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र त्याच कालावधीत परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी शेतीला फटका बसला. भातशेती आडवी झाल्याने नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता.
दसऱ्याचा मुहूर्त साधून सुरू करण्यात आलेल्या कापणीतही अडथळे आले. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे भातकापणीच्या कामात व्यपत्त्यय येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी शेताच्या बांधावरच गेली; मात्र अखेर नोव्हेंबरमध्ये पावसाने परतीची वाट धरल्यानंतर भात कापणीने वेग घेतला. त्यामुळे कापणी अंतिम टण्यात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 19/Nov/2024