दापोली : दापोली विंटर सायक्लोथॉन शॉर्ट सिटी लूप राईडमध्ये स्थानिक पातळीवरचे एकूण १५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात सायक्लोथॉन स्पर्धा पार पडली. दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सीझन ६ मध्ये १० नोव्हेंबरला १ हजार + मीटर चढ-उतार असणारी आव्हानात्मक ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रूट राईड झाली.
यामध्ये देश-विदेशातील अनेक नावाजलेले स्पर्धक सहभागी झाले होते. स्थानिक दापोली परिसरातील स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून १७ नोव्हेंबरला आयोजित केलेली शॉर्ट सिटी लूप राईड स्पर्धा आणि फन राईड सोहनी विद्यामंदिर मैदान येथे उत्साहात झाली. यामध्ये ७ ते ६० वर्षे वयोगटातील १५० स्पर्धक सहभागी झाले होते. ४ किमीच्या शॉर्ट सिटी लूप राईड मार्गावर स्पर्धकांनी १ ते २५ फेऱ्या मारत ४ ते १००+ किमी अंतर सायकल चालवली. १०० किमी अंतर सायकल चालवण्यासाठी सात तासांची वेळमर्यादा देण्यात आली होती. पहाटे पाच वाजता सुरू झालेली ही राईड दुपारी १२ पर्यंत चालली.
सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच ५०, ७०, १०० किमी सायकलिंग करणाऱ्यांना सर्वांना रोख रक्कम देण्यात आली. नितीन बर्वे, मकरंद पुजारी, सार्थक मांडवकर, अद्वैत अमृते, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे यांनी १००+ किमी सायकल चालवली. नीशा शर्मा, वेदांग करंदीकर, स्वराज मांजरे, श्रवण हांडे इत्यादींनी ७०+ किमी सायकल चालवली. मानसी फाटक, रिद्धीमा चव्हाण, अन्वय मंडलिक, वेद गोरिवले, आहान अमृते इत्यादी अनेकांनी ५० किमी सायकल चालवली. ७ वर्ष वयोगटातील छोटे सायकलस्वार आभा फाटक, अंश पांडे, आहान अमृते, पुस्कराज कदम, आराध्य गोरिवले, मेघराज कळंबकर आदींनाही गौरविण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 19/Nov/2024














