रत्नागिरी : सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

◼️ निवडणूक आयोग आणि पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत काल संपली आहे. त्यानंतर कुणीही प्रचार अथवा बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. असे केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला होता. मात्र असे असताना देखील मयूरेश पाटील, मिरजोळे नामक इसमाने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याने तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात बीएनएस कलम २२३, १७५, ३५६(२), लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूरेश पाटील याने तीन ऑडिओ व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. याबाबतची तक्रार माजी नगरसेवक निमेश नायर यांनी पोलीस स्थानकात दिली आहे. या क्लिप अजून कुणी प्रसारित केल्या आहेत याबाबत देखील पोलिसांकडून माहिती घेतली जात असून अजून काहींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 19-11-2024