गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाकरिता येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात ३२२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ लाख ४२ हजार ७०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघात एकूण ३२२ मतदान केंद्रावर १ हजार ४३६ मतदान अधिकारी नेमण्यात आले आहेत. शिपाई ३२२, आशा सेविका ३२२ व स्वयंसेवक ६४४ तर ४३ बस, १० मिनीबस व ४ जीप अशी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारसंघात ५३ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गुहागर तालुक्यात ४६ हजार ५९३ पुरुष मतदार तर ५५ हजार २५२ स्त्री मतदार असे १ लाख १ हजार ८४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
खेडमधून ३४ हजार ५५ पुरुष मतदार तर ३५ हजार ४५४ महिला मतदार असे एकूण ६९ हजार ५०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चिपळुणातल ३४ हजार ८६३ पुरुष मतदार तर ३६ हजार ४८७ महिला मतदार असे एकूण ७१ हजार ३५० मतदार मतदान हक्क बजावणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 AM 20/Nov/2024