मंडणगड तालुक्यात ७४ मतदान केंद्रे सज्ज

मंडणगड : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेकरिता तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी तालुक्यातील ७४ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आज(ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी ७४ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ७४, आशासेविका ७०, अंगणवाडी सेविका ७०, कार्यालयीन सेवक ७०, स्वयंसेवक ७४, पोलिस अधिकारी ३, पोलिस कर्मचारी ९१, गृहरक्षक दलाचे जवान ७०, सशस्त्र सीमा दलाचे १२ जवान असे कर्मचारी तैनात करण्यात आहे आहेत, कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता ११ एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १७ मतदान केंद्रांवर नेटवर्क नसल्याकारणाने या ठिकाणी १७ शेंडो मॅसेंजर (संदेश वाहकांची) नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुक्यात एकूण ५७ हजार ४७७ मतदार या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यात २९ हजार ९१२ महिला मतदार व २७ हजार ५६६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मंडणगड तालुक्यात १४ दिव्यांग व ८५ वर्षांच्या वरील २२६ ज्येष्ठ नागरिक असे एकूण २४० होम व्होटर आहेत. यात २१० ज्येष्ठ नागरिक मतदार व १४ दिव्यांग असे २२४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावत गृह मतदान केले आहे.

मतदान प्रक्रियेचे नियोजन
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मंडणगड़ तालुक्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी ७४ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ७४, आशासेविका ७०. अंगणवाडी सेविका ७०. कार्यालयीन सेवक ७०, स्वयंसेवक ७४. पोलिस अधिकारी ३, पोलिस कर्मचारी ९१, गृहरक्षक दताचे जवान ७०, सशख सीमा दलाचे १२ जवान असे कर्मचारी तैनात करण्यापर्यंत नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 20/Nov/2024