राजापूर : राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासह येत्या शनिवारी (ता. २३) होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ३४५ मतदान केंद्रांवर आज मतदान होणार असून त्यासाठी सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. यामध्ये १ लाख २४ हजार ५७० महिला, तर १ लाख १३ हजार ८३९ पुरुष असे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ४०९ मतदार विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
उमेदवारांचे भवितव्य मतदार मतदानाच्या माध्यमातून मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. ३४५ मतदान केंद्रांपैकी १७३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आले आहे. शहरातील विश्वनाथ विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्र, लांजा गोंडेसखल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिव्यांग मतदान केंद्र, तर लांजा येथील अल्अमिन उर्दू हायस्कूल येथे युवा मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 20/Nov/2024