पावस : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पावस ते मावळंगे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दोन्ही बाजूला खोदाईमुळे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदेशीर खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे. या रस्ता खोदाईमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. माती रस्त्यावर येत असल्याने वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतोष पोकडे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 20/Nov/2024