रत्नागिरी : विठ्ठल मंदिरात ३० नोव्हेंबरला जीवनगाणे संगीत कार्यक्रम

रत्नागिरी : येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात ३० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अनिल आणि अस्मिता लोंढे आणि सहकारी यांच्या जीवनगाणे या हिंदी, मराठी चित्रपटातील भावगीत व भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.

श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे खजिनदार प्रमोद रेडीज आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संयोजक अण्णा लिमये आणि सुरेंद्र घुडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. आनंद देणे आणि घेणे या एकमेव उद्देशाने या कार्यक्रमात कलाकार सहभागी होणार असून कराओकेच्या संगीत मदतीने भावपूर्ण भक्तिगीते सादर करणार आहेत. रसिकांनी या संगीतमय मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रमोद रेडीज यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 20/Nov/2024