मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वेगाने मतदान होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात सरासरी 18.14 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंत गडचिरोतील आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक 30.75 टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ अहेरी मतदारसंघात 30.06 टक्के तर उरणमध्ये 29.26 टक्के इतके मतदान झाले आहे. यंदा निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा कितपत फायदा होणार, हे थोड्यावेळात कळेल. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
सर्वाधिक मतदान झालेले मतदारसंघ
१ आरमोरी ३०.७५
२ अहेरी ३०.०६
३ उरण २९.२६
४ आमगाव २९.०६
५ अर्जुनी-मोरगाव २७.४
६ दिंडोरी २६.४१
७ सिल्लोड २६.२८
८ करवीर २६.१३
९ शहादा २४.९८
१० वणी २४.८८
११ चिमूर २४.६८
१२ नवापूर २४.५८
१३ चिपळूण २४.५७
१४ गुहागर २४.३६
१५ ब्रह्मपुरी २४.१५
मुंबईत किती टक्के मतदान?
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सकाळी ७ ते ११ दरम्यान 15.78 टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.99 टक्के मतदान झाले. मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. सकाळी 11 वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात झाले. याठिकाणी 12.82 टक्के इतका मतदानाचा टक्का नोंदवण्यात आला. मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 23.42 टक्के मतदान झाले. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान झाले. याठिकाणी १३.९८ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली.
बारामती मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला
पुणे जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात सरासरी 15.64 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46 टक्के तर सर्वाधिक जास्त मतदान १८.८१ टक्के मतदान हे बारामतीत झाले.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
अहमदनगर – 18.24 टक्के
अकोला – 16.35 टक्के
अमरावती – 17.45 टक्के
औरंगाबाद- 18.98 टक्के
बीड – 17.41 टक्के
भंडारा- 19.44 टक्के
बुलढाणा- 19.23 टक्के
चंद्रपूर- 21.50 टक्के
धुळे – 20.11 टक्के
गडचिरोली- 30 टक्के
गोंदिया – 23.32 टक्के
हिंगोली -19.20 टक्के
जळगाव – 15.62 टक्के
जालना- 21.29 टक्के
कोल्हापूर- 20.59 टक्के
लातूर 18.55 टक्के
मुंबई शहर- 15.78 टक्के
मुंबई उपनगर- 17.99 टक्के
नागपूर – 18.90 टक्के
नांदेड – 13.67 टक्के
नंदुरबार- 21.60 टक्के
नाशिक – 18.71 टक्के
उस्मानाबाद- 17.07 टक्के
पालघर- 19.40 टक्के
परभणी- 18.49 टक्के
पुणे – 15.64 टक्के
रायगड – 20.40 टक्के
रत्नागिरी- 22.93 टक्के
सांगली – 18.55 टक्के
सातारा -18.72 टक्के
सिंधुदुर्ग – 20.91 टक्के
सोलापूर – 15.64 टक्के
ठाणे – 16.63 टक्के
वर्धा – 18.86 टक्के
वाशिम – 16.22 टक्के
यवतमाळ -16.38 टक्के
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 20-11-2024