देवरुख : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी संगमेश्वर तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे.
ही परीक्षा रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल या ठिकाणी होणार आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बरगजे, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी तायक्वांदो फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मिलिंद पठारे आदींच्या उपस्थितीत ही परीक्षा होणार आहे.
नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब, लायन्स तायक्वांदो क्लब संगमेश्वर यांच्यावतीने निवड झालेल्या खेळाडूंचा छोटेखानी सत्कार समारंभ नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब या ठिकाणी पार पडला. यावेळी संदेश जागुष्टे, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, सामाजिक कार्यकर्ते आर्ते, स्वप्निल दांडेकर, गायत्री शिंदे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 20/Nov/2024