रत्नागिरी : शहरातील मांडवी 80 फूटी हायवे येथील एका अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर बुधवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वा. सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने या आगित कोणतीही जिवितहानी झालेली नसून नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले.
बुधवारी दुपारी मांडवी 80 फूटी हायवेवरील क्षितीज अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील असित कादर खान यांचा फ्लॅट आहे. गच्चीनजीकच्या भागात काही भंगार ठेवण्यात आले होते. त्या भंगारातूनच लाईटची केबल गेलेली होती. शॉर्ट सर्किटमुळे त्या केबलसह भंगारातील टायर, सायकल व अन्य सामानाने पेट घेतल्याने सर्वत्र धुराचे लोळ दिसू लागले. याबाबत रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. फायरमन नरेश मोहिते, शिवम शिवलकर, रोहन घोसाळे, संकेत पिलणकर, सुरज पवार, प्रविण वाघेला आणि रोहन गझने यांनी या आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 21-11-2024