CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची डेटशीट जाहीर

CBSE Exam Datesheet 2025 Released | नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक cbse.gov.in या वेबसाईटवर जाहीर केलं आहे.

तिथं विद्यार्थ्यांना ते पाहता येईल. सीबीएसईकडून परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येईल. तर, दहावीची परीक्षा 18 मार्चला संपणार आहे. यानंतर बारावीची परीक्षा 4 एप्रिलाला संपेल.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कित्येक दिवसांपासून वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात. सीबीएसईच्या डेटशीटनुसार दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरु होईल.

CBSE Exam Datesheet 2025: कोणत्या विषयाच्या परीक्षेनं सुरुवात

दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेनं होईल.तर, शेवटचा पेपर माहिती तंत्रज्ञान विषयाचा असेल, या विषयाची परीक्षा 18 मार्चला संपन्न होईल. तर, बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयानं होईल. तर 4 एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.

CBSE Exam Datesheet 2025: प्रत्येक विषयात किती गुण मिळावावे लागणार?

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं असल्यास विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील. दहावीचे पेपर 10:30 ते 01:30 दरम्यान आयोजित केले जातील. बारावीच्या परीक्षेची वेळ देखील हिच असेल.


CBSE Exam Datesheet 2025:दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक

इंग्रजी कम्युनिकेटिव / इंग्रजी भाषा आणि साहित्य – 15 फेब्रुवारी, 2025
विज्ञान – 20 फेब्रुवारी 2025
फ्रेंच / संस्कृत – 22 फेब्रुवारी 2025
सामाजिक शास्त्रे – 25 फेब्रुवारी 2025
हिंदी कोर्स ‘अ’ / ‘ब’- 28 फेब्रुवारी 2025
गणित – 10 मार्च, 2025
माहिती तंत्रज्ञान – 18 मार्च, 2025

CBSE Exam Datesheet 2025: बारावी परीक्षा डेटशीट

शारीरिक शिक्षण – 15 फेब्रुवारी 2025
भौतिकशास्त्र – 21 फेब्रुवारी 2025
व्यवसाय शिक्षण – 22 फेब्रुवारी 2025
भूगोल – 24 फेब्रुवारी 2025
रसायनशास्त्र – 27 फेब्रुवारी 2025
गणित – मानक / उपयोजित गणित – 8 मार्च, 2025
इंग्रजी वैकल्पिक / इंग्रजी आवश्यक – 11 मार्च, 2025
अर्थशास्त्र – 19 मार्च, 2025
राज्यशास्त्र – 22 मार्च, 2025
जीवशास्त्र – 25 मार्च, 2025
लेखांकन – 26 मार्च, 2025
इतिहास – 1 अप्रैल, 2025
मानसशास्त्र – 4 अप्रैल, 2025

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 21-11-2024