रत्नागिरी : तालुक्यातील नेवरेकर वठार येथील वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ वा. घडली. शुभांगी गोपाळ नेवरेकर (७७, रा. खोपटकरवाडी नेवरेकरवठार, रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
याबाबत त्यांच्या पुतण्याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, सोमवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. जेवण्यापूर्वी शुभांगी नेवरेकर यांना चक्कर आली म्हणून त्यांना प्राथमिक उपचारांसाठी बसणी येथील खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले होते. त्या नंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असाताना उपचारादरम्यान मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ वा. त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 21/Nov/2024