रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे धनगरवाडी येथे तरुणाचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विजय गोविंद गोरे (३७, रा. नाखरे धनगरवाडी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वा. विजय राहत्या घरी झोपी गेला होता. तो मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वा. पर्यंत उठला नसल्याने त्याच्या आईने त्याला हाक मारुन व हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उठला नाही. तसेच त्याच्या शरिराची कोणतीही हालचाल दिसून येत नव्हती आणि त्याचे संपूर्ण शरीर थंड पडलेले होते. त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 21/Nov/2024














