रत्नागिरी : शहरात सोमवारी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी धनजी नाका ते मारुती मंदिरमार्गे थिबा पॅलेस मार्गावर फेरी काढण्यात आली.
कोकण नगर ते मारुती मंदिरमार्गे उद्यमनगर होऊन पुन्हा कोकणनगर येथे दावते इस्लामी यांची एक ईद- ए-मिलादची फेरी काढण्यात आली होती. त्यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ, जाणकार लोक, तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या फेरीत चारचाकी गाडी, टेम्पो, दुचाकी घेऊन लोक सहभागी झालेले दिसत होते. या दोन्ही फेरीचे स्वागत मारुती मंदिर येथे श्री रत्नागिरीचा राजा आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या वतीने पुष्पगुच्छ व पेढे वाटून स्वागत करण्यात आले.
या वेळी दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद-ए-मिलाद मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले चित्र दिसत होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून फेरीत हे चित्र दिसत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 17/Sep/2024