इम्फाळ : तीन महिला, तीन मुले अशा सहाजणांची हत्या करणाऱ्या कुकी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी एनडीएच्या आमदारांनी केल्यानंतर व तसा ठराव संमत केल्यामुळे को-ऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटी (कोकोमी) या संस्थेने आपले आंदोलन आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.
एनडीए आमदारांच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावावर नेमकी काय कार्यवाही होते याकडे आमचे बारीक लक्ष आहे. त्या घडामोडींनुसार पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 21-11-2024