लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने वाटूळ दाभोळ रस्त्याच्या दुतर्फा विलवडे व्हेळ व वाघणगाव येथे लागवड केलेल्या झाडांची जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पुजार यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली.
सध्या मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व त्यामुळे स्थानिक व जंगली झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन राजापूर – लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने वाटूळ – दाभोळ रस्त्यावरील विलवडे व्हेळ व वाघणगाव येथे वड, पिंपळ, चिंच, काजरा, ताम्हण अशा स्थानिक ५०० वृक्षांची लागवड केली होती. त्या परिसराला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पुजार यांनी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी भेट देऊन संस्थेमार्फत लागवड केलेल्या झाडांची पाहणी केली. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत संस्थेला शुभेच्छा दिल्या.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने पर्यावरण संतुलनाचे अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत जि.प. उपमुख्यकायकारी राहुल देसाई, लांजा चे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. गिरी हे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 21/Nov/2024