चिपळूण : सावर्डे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली आहे. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे व अमृत कडगावे यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. यानंतर श्रीफळ वाढवून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात सांघिक स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ४ बाय १०० मीटर रिले या क्रीडा प्रकारांचा तर गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, १०० मीटर धावणे, २०० मी. धावणे, ४०० मी. धावणे या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सहायक शिक्षक अशोक शितोळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 21/Nov/2024