रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. विमा योजनेचा विमा संरक्षित कालावधी हा दि. १ डिसेंबर २०२४ ते दि. १५ मे २०२५ पर्यंत आहे. अवेळी पाऊस कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळपीक विमा योजना आहे. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडलांत आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येते. खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील; मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 21/Nov/2024