रत्नागिरी : अलीकडेच रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे हायटेक सुशोभीकरण करण्यात आले; मात्र रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या मागील भागात असलेले प्रवेशद्वार बकाल स्थितीत आहे. या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे या प्रवेशद्वाराला ‘डम्पिंग ग्राऊंड’चे स्वरूप आले आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे रेल्वेस्थानकाचे रूपडे बदलून गेले. नव्या हायटेक स्थानकात प्रवाशानांही एखाद्या एअरपोर्टवर आल्यासारखे वाटते; मात्र स्थानकाच्या पलीकडे गेल्यानंतर हे प्रवेशद्वार कचऱ्याच्य ढिगाने भरलेले आहे. याच परिसरात कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.
आणि कोकण रेल्वेचा सिग्नल नियंत्रण कक्ष आहे; मात्र या प्रवेशद्वाराजवळ कचरा टाकून त्याचे ‘डम्पिंग’ ग्राऊंड झाले आहे. एका बाजूला झकपक, तर दुसऱ्या बाजूला बकालपणा असे स्वरूप स्थानकाला आले आहे.
या परिसरात कचरा साचल्याने कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाच त्याचा त्रास होत असून, आसपास राहण्याऱ्या वसाहतील नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. येथे कचऱ्याचा डोंगर झाल्याने गुरेही येतात. ही गुरे स्थानकाच्या पुलावरही जातात. त्यामुळे पूलही शेणाने व्यापलेला असतो. तसेच ही गुरे फलाटावर जाण्याचाही धोका संभवतो. यावर तातडीने कारवाई करून हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 21/Nov/2024