संगमेश्वर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कसबा संगमेश्वर येथील श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिरामध्ये कालभैरव जयंतीचा उत्सव कार्तिक वद्य अष्टमी शके १९४६ शनिवारी (२३ नोव्हेंबर) होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री काळभैरव जयंतीनिमित्त आयोजित होणारे कार्यक्रम असे : २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता प्रवचन- ह.भ.प. श्री. श्रीनिवास पेंडसे, शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. प्रकटदिन किर्तन – ह.भ.प. श्रीनिवास पेंडसे साथसंगत – तबला किरण लिंगायत, संवादिनी आनंद लिंगायत, दुपारी १२.३० वाजता आरती व मंत्रपुष्पांजली, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत महिलांचे भजन, सायंकाळी ७.३० ते रात्री ८ यावेळेत आरती व मंत्रपुष्पांजली, रात्री ८.३० ते १०.३० वाजता : संगीत भजन.
कालभैरव जयंतीनिमित्त दर्शनाचा आणि विविध कार्यक्रमांचा लाभ सर्व भक्त मंडळींनी घ्यावा, असे आवाहन श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिर कसबा संगमेश्वर विश्वस्त मंडळाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 21/Nov/2024














