दापोली : कोंढे गावाची ९५ लाख रुपयांची पाणी योजना गेल्या १० वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे ती का रखडली आहे याचा शोध आता पंचायत समिती चौकशी करून घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या योजनेचे वीजबिल थकल्याने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा थांबला आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यातच जुनी योजना पूर्ण होण्याआधीच १ कोटी ९५ लाख रुपयांची नवी योजना मंजूर होवून तिचे काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 21/Nov/2024













