रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांच्या डोळ्यांचे उपचार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया एमआयडीसीतील लायन्स आय हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
मतदारांच्या मतांवरच या देशाची लोकशाही अवलंबून आहे. मतदान केल्यामुळेच योग्य व्यक्ती आमदार, खासदार म्हणून जनतेसाठी कार्य करू शकतात.
यासाठीच सर्वांनी एक सुजाण नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क हा १०० टक्के बजावायला हवा. ज्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत अशांसाठी डोळ्यांचे उपचार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया लायन्स आय हॉस्पिटल, एमआयडीसी येथे मोफत करण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 22/Nov/2024