रत्नागिरी : उत्तरेकडील शीतलहरी प्रभावीपणे सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. कमाल तापमानात सातत्याने घट होणार असून, या आठवड्याच्या अखेरीसह पुढील आठवडा हा थंडीचा राहणार आहे. यामध्ये तापामानात चार ते पाच अंशांची घट होऊन कोकणात सर्वत्र गारठा पसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांनी किनारपट्टीचा ताबा घ्यायला सुरुवात केल्याने किनारी गावात गुलाबी थंडीचा माहोल तयार झाला आहे. दिवसाही ताशी १० ते २० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने दुपारच्या उन्हातही हलका गारवा आहे. रात्रीच्या किमान तापमानासह दिवसाच्या कमाल तापामानतही सातत्याने घट होत असल्याने गरठ्याचे प्रमाण वाढत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पहाटे तापमान २८ अंश सेल्सिअस होते. सकाळी ८ वाजता तापमानात अर्धा अंशाने वाढ झाली होती. दुपारी तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविले. तरीही उन्हाच्या कोरड्या वातावरणात हलका गारवा होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 22-11-2024