माखजन : निवडणूक म्हटली की केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी नेमले जातात. यांची व्यवस्था करणे आणि निवडणूक प्रक्रिया उत्तम प्रकारे पार पाडणे ही त्या-त्या विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. दापोलीचे प्रांताधिकारी तथा दापोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी निवडणूक कालावधीत राबवलेली यंत्रणा लक्षवेधी ठरली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे केंद्राध्यक्षांनी त्यांचे आभार मानले.
केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी १, २, ३ यांचे प्रशिक्षण, पोस्टल मतदान प्रक्रिया, प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान साहित्य वाटप, निवडणुकीच्या दिवशी प्रत्येकाला डॉ. अजित थोरबोले यांच्याकडून झालेले वैयक्तिक मार्गदर्शन, निवडणूक प्रक्रिया संपल्यावर साहित्य जमा करून घेण्यासाठी असलेली सुसूत्रबद्ध व्यवस्था येण्या-जाण्यासाठी असलेली एसर्ट बसेसची सोय, अडचणीच्य ठिकाणी एसटी बसेस पोहेचत नसेल तर त्यांनी छोट्या वाहनांची व्यवस्थाही केली होती. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता, जेवणाची व्यवस्था आदी सगळ्याच गोष्ट अगदी काटेकोरपणे झाल्याने दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारी यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 22/Nov/2024