पावस : शहरातील गोगटे जोगळेकर कॉलेजमधील विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात असणारा भौतिकशास्त्राचा विद्यार्थी यश श्रीपाद देवदास याची अकरावी राष्ट्रीय भौतिक परिषद, मेघालय येथे निवड झाली होती. या परिषदेसाठी देशभरातून हजारो जणांनी त्यांचे प्रोजेक्ट पाठवले होते, त्यापैकी फक्त १८८ विद्यार्थ्यांना मेघालय युनिव्हर्सिटीला सादरीकरणासाठी बोलावण्यात आले होते.
यश देवदास याने अंतराळातला कचरा आणि त्याचे व्यवस्थापन व उपाययोजना (असा जागतिक पातळीवर भेडसावणारा प्रश्न) त्याच्यावर प्रोजेक्ट सादर केला. त्याचे सादरीकरण उत्तम झाले, त्यावर तेथील प्रमुखांनी त्याला प्रश्न विचारून माहिती घेतली. यशने त्यांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
यश देवदासला मेघालय युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या अकराव्या राष्ट्रीय भौतिक परिषदेमध्ये प्रथम पारितोषिक रुपये ५००० आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या वार्षिक पुस्तकामध्ये प्रोजेक्ट त्यांनी प्रसिद्ध केला. त्याने रत्नागिरीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर केले. त्याला गोगटे- जोगळेकर कॉलेजच्या भौतिकशास्त्र शाखेच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 22/Nov/2024














