दापोली : दापोलीत यंदा विधानसभेला ६६.८४ टक्के मतदान झाले आहे. गतवेळी म्हणजेच २०१९ मध्ये ६५.९० टक्के मतदान झाले. वाढीव एक टक्का मतदान कुणाच्या पथ्थ्यावर पडणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. बुधवारी (ता. २०) रात्री पावणेबारा वाजता सर्व मतदान यंत्र दापोली येथील विश्वेश्वरय्या सभागृहात सुरक्षित पोहोचल्या.
दापोली विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबरला मतदान झाले असून त्याची मोजणी २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दापोली विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत व उत्साहात पार पडले. त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंब व सर्व सहकारी यांनी हिरीरीने चोख कामगिरी बजावली. निवडणुकीत ६६.८४ मतदान झाले आहे. एकूण ३९२ मतदान केंद्र आहेत. परंतु दोन ठिकाणी मशिनरीमध्ये बिघाड झाल्याने दोन नवीन मशीन तातडीने हजर करण्यात आल्या. त्यामुळे एकूण ३९४ ईव्हीएम मशीन आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 22/Nov/2024














